बांबू लागवडीसाठी सरसावले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:00+5:302021-09-13T04:41:00+5:30

०००००००००००० वन्यजीव प्रेमींकडून दुर्मीळ घोरपडीला जीवदान वाशिम: निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या वन्यजीव प्रेमी सदस्यांनी शनिवारी मानोरा तालुक्यातील कोलार येथे मंदिरात ...

Villagers rushed for bamboo cultivation | बांबू लागवडीसाठी सरसावले ग्रामस्थ

बांबू लागवडीसाठी सरसावले ग्रामस्थ

००००००००००००

वन्यजीव प्रेमींकडून दुर्मीळ घोरपडीला जीवदान

वाशिम: निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या वन्यजीव प्रेमी सदस्यांनी शनिवारी मानोरा तालुक्यातील कोलार येथे मंदिरात आढळून आलेल्या बेंगाल मॉनिटर लिझार्ड या दुर्मिळ घोरपडीला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. उमेश जंगले या वन्यजीव प्रेमीने ही घोरपड पकडून जंगलात सोडली. यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.

०००००००००००००००००

बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पीक धोक्यात

वाशिम: सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रामुख्याने करपा, शेंग करपा या बुरशीजन्य रोगांसह पाने खाणारी अळी, मिलीबग आदी किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. कृषी विभाग या रोगावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीनेही मार्गदर्शन करीत आहे. ०००००००००००००००००

मानोरा, मालेगाव आठवड्यापासून कोरोना अहवालात निरंक

वाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग जवळपास पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सद्यस्थितीत १४ रुग्ण ॲक्टिव्ह असून, मंगरुळपीर, रिसोड, वाशिम आणि कारंजा तालुका वगळता मालेगाव आणि मानोरा तालुक्यात आठवडाभरापासून एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने या तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

०००००००००००००००००००००००

लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे (अपेक्षा)

वाशिम: जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्यापही टळलेला नाही. शासनाकडून सुरू करण्यात आलेले १८ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण आता ६० टक्क्यांच्या घरात पोहोचले असून, लहान मुलांच्या लसीकरणाचीही तयारी सुरू केल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लहान मुलांचे लसीकरण त्वरित सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.--०००००००००००००००००००००

साथरोग नियंत्रणासाठी ताेकडे उपाय

वाशिम: जिल्ह्यात सर्वत्र गेल्या महिनाभरापासून डेंग्यूसदृश आजारासह मलेरिया, विषमज्वराचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाकडून आवश्यक प्रमाणात उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. याची जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

०००००००००००००००००००००

120921\12wsm_4_12092021_35.jpg

बांबु लागवडीसाठी सरसावले ग्रामस्थ

Web Title: Villagers rushed for bamboo cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.