शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

vidhan sabha 2019 : सेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 2:43 PM

काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याचे काहीसे चित्र सद्या दिसून येत आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भाजपाकडून आमदार म्हणून नेतृत्व करित असलेल्या जिल्ह्यातील वाशिम, कारंजा या मतदारसंघांसोबतच रिसोड मतदारसंघावरही भाजपाने दावा ठोकला आहे. दुसरीकडे शिवसेनाही तीन्ही मतदारसंघांमध्ये लढण्यास इच्छुक आहे. अशात युती झाल्यास प्रामुख्याने शिवसेनेच्याच मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तुलनेने जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याचे काहीसे चित्र सद्या दिसून येत आहे.वाशिम मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करित असलेले लखन मलिक भाजपाकडून यंदा पुन्हा उमेदवारीची ‘डिमांड’ करित आहेत; मात्र युती न झाल्यास मलिकांना २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.कारंजा लाड विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनेतून भाजपात पक्षप्रवेश करून निवडणूक लढलेल्या राजेंद्र पाटणी यांचा २०१४ च्या निवडणूकीत केवळ ४१४७ मतांनी विजय झाला होता. यंदा शिवसेनेत महत्वाचे स्थान मिळवून असलेले राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार प्रकाश डहाके यांना सेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आणि युती तुटल्यास पाटणींचा विजय सोपा नसणार, अशी चर्चा होत आहे.रिसोड मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसकडून अमीत झनक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याकरिता अनेकजण इच्छुक असून शिवसेनेने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. वंचित बहुजन आघाडीकडूनही या मतदारसंघात तगडा उमेदवार उभ्या करण्याच्या हालचाली गतीमान झाल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणालाजिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात प्रामुख्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके, विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी, अमीत झनक, लखन मलिक आदिंचा समावेश आहे.

काँग्रेस-रा.काँ. च्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्षआगामी विधानसभा निवडणुकीत युती तुटणार की भाजपा-सेना सोबत लढणार, यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस-रा.काँ.ची भूमिका नेमकी काय राहणार, कोणते उमेदवार दिले जाणार, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

९.५३ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्कयंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये महिला व पुरूष असे एकंदरित ९ लाख ५३ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ३३-रिसोड मतदारसंघात ३३१ मतदान केंद्र राहणार असून वाशिम मतदारसंघात ३६९ आणि कारंजा लाड मतदारसंघात ३५२ असे एकूण १०५२ मतदान केंद्र असणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण