शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

VIDEO : माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 4:20 PM

गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागाने तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण गावकरी करीत आहेत.

वाशिम - गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागाने तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण गावकरी करीत आहेत.पार्डी ताड येथे  माकडांचे अनेक कळप गेल्या दोन वर्षांपासून गावातच फिरत आहेत. शेकडो माकडे गावात अन्नपाण्यासाठी सैरभैर फिरत असून, या घरावरून त्या घरावर सतत उड्या मारत आहेत. त्यामुळे गुरांचे गोठे आणि घरांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. एका घटनेत, तर माकडांच्या उच्छादामुळे गोठ्यावरील छत कोसळून म्हशीला गंभीर दुखापतही झाली. सुदैवाने छतावरील दगड गुरांच्या अंगावर न पडल्याने त्यांचा जीव वाचला. यापूर्वीही माकडांमुळे घराचे छत पडल्याने ग्रामस्थांना दुखापती झाल्या आहेत.  पार्डी ताड येथे माकडाचे ८ ते १० कळप फिरत असून, माकडांच्या या कळपामुळे ओलिताची शेती करणा-या शेतक-यांत भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षी विलास खंडे यांच्यावर माकडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. अशोक डाळ यांच्या हाताला चावा घेतल्याने त्यांना शस्त्रक्रियाच करावी लागली होती. त्याशिवाय ज्ञानदेव सुर्वे, माणिक लांडगे यांनाही माकडांनी चावे घेतले होते. माकडांच्या भितीमुळे महिलावर्गातही भीतीचे वातावरण असून, महिला घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. घराबाहेर सुकण्यासाठी ठेवलेल्या कुरवड्या, मुंगवड्या आदिंसह धान्याचा फडशा ही माकडे पाडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत.

धोका टाळण्यासाठी वृक्षांची कटाईपार्डी ताड येथे माकडांचा धुमाकूळ वाढला आहे. गावातील झाडांवर ही माकडे बसतात आणि काही वेळाने घराच्या छतावर येतात, आवारात उड्या मारून घरातही घुसतात. त्यामुळे महिला, बालकांच्या जिवाला धोका झाला असून, माकडांच्या संचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील लोक घरासमोर असलेले वृक्षच तोडत आहेत. आजवर १५ ते २० वृक्ष माकडांच्या भीतीमुळे तोडण्यात आले आहेत. यामुळे गावातील हिरवळही नष्ट होत असून, गाव भकास होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन माकडांना पिटाळून लावले नाही, तर पार्डी ताड गावात येत्या काही दिवसांत वृक्षच दिसणार नाही, अशी भितीही निर्माण झाली आहे.

टॅग्स :Monkeyमाकडwashimवाशिमnewsबातम्या