VIDEO : मानेत अडकलेली बरणी घेवून कुत्र्याने दिवसभर रस्त्यावरुन ठोकली धूम!

By Admin | Updated: April 24, 2017 19:21 IST2017-04-24T19:05:49+5:302017-04-24T19:21:04+5:30

 नंदकिशोर नारे /ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 24 -  कुत्र्याची शेपटी वाकळी ते वाकळीच अशी एक म्हण मराठीत आहे, ती ...

VIDEO: The dog is stuck with a neck stuck in the neck! | VIDEO : मानेत अडकलेली बरणी घेवून कुत्र्याने दिवसभर रस्त्यावरुन ठोकली धूम!

VIDEO : मानेत अडकलेली बरणी घेवून कुत्र्याने दिवसभर रस्त्यावरुन ठोकली धूम!

 नंदकिशोर नारे /ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24 -  कुत्र्याची शेपटी वाकळी ते वाकळीच अशी एक म्हण मराठीत आहे, ती कोणी कितीही सरळ केल्यास होवू शकत नाही. कोण्यातरी दुकानातील एका बरणीमध्ये असलेले पदार्थ खाण्याच्या नादात कुत्र्याने बरणीत मान टाकली व ती बरणी त्याच्या मानेत अडकली. बरणी मानेत अडकल्यानंतर कालपासून कोणालाही जवळ येवू न देता कुत्रा रस्त्यावरुन इकडून तिकडे धूम ठोकतांना दिसून आल्याची घटना २४ एप्रिल रोजी निदर्शनास आली. एक दिवसाच्या महतप्रयासानंतर दोन युवकांना दुसºया दिवशी ते बरणी काढण्यात यश आले.
 
वाशिम शहरातील पाटणी चौकातील कोण्यातरी दुकानात शिरून कुत्र्याने बरणीत तोंड टाकून ते मानेत अडकून घेतली. कुत्रा बरणी मानेत घेवून जोराने रस्त्याने धावतांना पाहून ती बरणी काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. संपूर्ण दिवस निघून गेला परंतु कोणालाही यश आले नाही. दुसऱ्या दिवशी २४ एप्रिल रोजी सदर कुत्रा पाटणी चौकातील पाटणी कॉम्पलेक्स परिसरात अनिल सोनोने व नासिर शहा या युवकांना दिसला. त्यांनी त्या कुत्र्याला पकडून त्यातून त्याची सुटका केली. 
 
 
https://www.dailymotion.com/video/x844w34

Web Title: VIDEO: The dog is stuck with a neck stuck in the neck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.