कारंजा पालिका उपाध्यक्षांचा राजीनामा; एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:21 IST2018-01-15T22:18:06+5:302018-01-15T22:21:54+5:30

कारंजा लाड (वाशिम): येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष एम.टी.खान यांनी ठरल्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, खान यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vice president of karanja lad palika resign, one year term complete! | कारंजा पालिका उपाध्यक्षांचा राजीनामा; एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण!

कारंजा पालिका उपाध्यक्षांचा राजीनामा; एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण!

ठळक मुद्देनव्या निवडीकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम): येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष एम.टी.खान यांनी ठरल्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी पुढील कार्यवाहीकरिता राजीनामा पत्र जिल्हाधिकाºयांकडे पाठविले आहे. दरम्यान, खान यांच्या रिक्त झालेल्या पदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारंजा नगर परिषदेची पहीली सर्वसाधारण ४ जानेवारी २०१७ रोजी झाली होती. त्यात पालिकेच्या उपाध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाचे मुबारक तमीज उर्फ एम.टी.खान यांची बहुमताने निवड करण्यात आली होती. पक्षाच्या निर्णयानुसार त्यांना उपाध्यक्ष पद एक वर्षाकरिता बहाल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी १५ जानेवारीला आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षांकडे सुपूर्द केला. रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर आता कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: vice president of karanja lad palika resign, one year term complete!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम