अंगणवाडीतील ‘पोषण आहार’ची पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 17:43 IST2021-08-21T17:42:42+5:302021-08-21T17:43:03+5:30
Washim News : बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे.

अंगणवाडीतील ‘पोषण आहार’ची पडताळणी!
वाशिम : अंगणवाडी केंद्रातील पात्र लाभार्थींना नियमानुसार पोषण आहार मिळत आहे की नाही? याची पडताळणी म्हणून वाशिम प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे.
कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत; मात्र पात्र बालके, स्तनदा माता आदी लाभार्थींना पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. संबंधित लाभार्थींना नियमानुसार पोषण आहार मिळतो की नाही, तेथे कोरोनाविषयक नियमाचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी गवळी यांनी वाशिम तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली. पंंचाळा येथे मागील आहार वाटपादरम्यान गर्दी आणि गोंधळ उडाला होता. ही परिस्थिती या महिन्यात निर्माण होऊ नये म्हणून तेथे भेट देऊन पाहणी केली. पोषण आहार वाटपात कुणी कुचराई करीत असेल तर संबंधितांची गय केली जाणार नाही, याचा इशाराही गवळी यांनी दिला.
नियमानुसार पोषण आहार वाटप करा!
कोरोनाकाळात प्रत्येक पात्र लाभार्थींना शासनाकडून मिळणारा पोषण आहार नियमानुसार वाटप होणे अपेक्षीत आहे. पोषण आहार वाटपादरम्यान कुठेही गर्दी, गोंधळ उडू नये तसेच नियमानुसार जेवढे धान्य आले, तेवढे धान्य पात्र लाभार्थींपर्यंत पोहचवा, अशा सूचना प्रियंका गवळी यांनी कर्मचाºयांना दिल्या.