१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:00 IST2018-08-24T18:00:03+5:302018-08-24T18:00:06+5:30
वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे.

१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कामकाजाला आॅनलाईनची जोड देण्यासाठी विविध पर्याय निवडले जात आहे. मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा आॅफलाईन पद्धतीने उपप्रादेशिक परिवहन विभागात स्वीकारला जातो. आता यामध्ये १ सप्टेंबरपासून बदल करण्यात आला आहे. ‘संपूर्ण वाहन ४.०’ अर्थात सारथी या आॅनलाईन प्रणालीमार्फतच वाहनाचा कर व पर्यावरण कर स्विकारण्यात येणार आहे. याकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाशिम येथे संबंधितांनी आपल्या वाहनाची ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच वाहनाचा कर भरणा केला जाणार आहे. वाहनाची नोंद ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर घेण्याकरीता संपूर्ण मुळ दस्ताऐवज कार्यालयात किमान तीन दिवस अगोदर सादर करणे आवश्यक आहे.
तसेच वाहन चालक परवानाधारकांना १ सप्टेंबर २०१८ पासून अनुज्ञप्तीची नोंद ‘सारथी ४.०’ या प्रणालीवर घेण्यात येवून त्याबाबतचा संपूर्ण शुल्काचा भरणा आॅनलाईनद्वारे सारथी या प्रणालीवरच करण्यात येणार आहे. तसेच शिकाऊ अनुज्ञप्तीकरीता ‘सारथी ४.०’ या प्रणालीवर आॅनलाईन अर्ज भरुन शुल्काचा भरणासुध्दा आॅनलाईनद्वारेच करणे आवश्यक आहे. संबंधितांनी या नवीन पद्धतीने १ सप्टेंबरपासून वाहन कर व पर्यावरण कराचा भरणा करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.