वाशिम जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा; कक्षाला लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 02:00 PM2019-07-20T14:00:58+5:302019-07-20T14:01:03+5:30

वाशिम : जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मंडळ १८ जुलै रोजी बरखास्त केल्यानंतर, १९ जुलै रोजी प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी सूत्रे स्विकारली.

Vehicle deposits of officials of Washim Zilla Parishad | वाशिम जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा; कक्षाला लावले कुलूप

वाशिम जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा; कक्षाला लावले कुलूप

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मंडळ १८ जुलै रोजी बरखास्त केल्यानंतर, १९ जुलै रोजी प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी सूत्रे स्विकारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली असून, कक्षाला कुलूप लावण्यात आले. विहित कालावधीत निवासस्थाने सोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला.
वाशिम जिल्हा परिषदेसह राज्यातील पाच जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांना राज्य शासनाने ३० डिसेंबर २०१८ रोजी दिलेली मुदतवाढ ३० जून २०१९ रोजी संपुष्टात आली. पुढील कार्यकाळाबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नव्हता. यासंदर्भातील दाखल याचिकेवरून १० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. तसे न झाल्यास प्रशासक नेमणे, यापैकी आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यानुसार शासनाने १८ जुलैला वाशिमसह पाच जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पंचायत समित्यांच्या सभापतींना बरखास्त केले आणि जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समितीचे प्रशासक म्हणून गटविकास अधिकाºयांची नियुक्ती केली. १९ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून तर सहाही गटविकास अधिकाºयांनी पंचायत समितीचे प्रशासक म्हणून सूत्रे स्विकारली. त्यानंतर विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन माहिती घेण्यात आली. दुसरीकडे पदाधिकारी मंडळ बरखास्त झाल्याने पदाधिकाºयांकडील वाहने जमा करण्याची प्रशासकीय कार्यवाही सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. सर्व पदाधिकाºयांचे कक्ष ताब्यात घेतले असून, त्या कक्षाला कुलूप लावण्यात आले. शुक्रवारी दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

स्वीय सहायक व अन्य कर्मचारी मूळ पदावर !
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व चार विषय समिती सभापतींचे स्वीय सहायक, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक, शिपाई, वाहन चालक यापैकी काही कर्मचाºयांना त्यांच्या मूळ पदावर रवाना करण्याचे आदेश १९ जुलै रोजी दीपक कुमार मीना यांनी काढले. काही कर्मचाºयांना तात्पुरत्या स्वरुपात रिक्त पदावर पाठविले जाणार आहे. पदाधिकाºयांच्या कक्षात पुरविण्यात आलेले विविध प्रकारचे साहित्य व सद्यस्थिती आदीसंदर्भातही माहिती घेण्यात आली. याप्रमाणेच पंचायत समिती स्तरावरील सभापती व उपसभापती यांच्या कक्षातील कर्मचाºयांनाही मूळ पदावर पाठविण्यात आले.

Web Title: Vehicle deposits of officials of Washim Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.