वाहनास अपघात; एक जण ठार; चार जखमी
By Admin | Updated: March 15, 2016 02:25 IST2016-03-15T02:25:45+5:302016-03-15T02:25:45+5:30
लग्नसमारंभ आटोपून वाशिमकडे परतत असताना भरधाव वेगातील कार उलटली.

वाहनास अपघात; एक जण ठार; चार जखमी
वाशिम: मूर्तिजापूर येथील लग्नसमारंभ आटोपून वाशिमकडे परतत असलेली भरधाव कार उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून, चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना तांदळी गावाजळ सोमवारी सायंकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास घडली. वाशिम पोलीस दलातील कर्मचारी हर्षल हिवराळे यांचा मूर्तिजापूर येथे विवाह होता. या विवाह समारंभासाठी वाशिमहून त्याचे मित्र गौरव भोंबे, श्याम घायल, सतीश ठाकरे, गजानन डहाळे व भूषण गव्हाणे मूर्तिजापूरला खासगी वाहनाने सकाळी गेले होते. लग्नसमारंभ आटोपून सायंकाळी वाशिमला परत येताना तांदळी शेवईजवळ चालकाचे नियंत्रण गेल्यामुळे भरधाव वेगातील कार उलटली. या अपघातामध्ये भूषण गव्हाने हा घटनास्थळीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेले गौरव भोंबे, श्याम घायल, सतीश ठाकरे व गजानन डहाळे यांना गंभीर दुखापत झाली.