पालेभाज्या स्वस्त, गृहिणींना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:21+5:302021-02-05T09:24:21+5:30
पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनात सध्या वाढ झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या हर्रासीत व्यावसायिकांना ...

पालेभाज्या स्वस्त, गृहिणींना दिलासा
पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनात सध्या वाढ झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या हर्रासीत व्यावसायिकांना फार कमी दराने पालेभाज्या मिळाल्याने दिवसभर बाजारातही कमी दरानेच विक्री करण्यात आली. कांदा आणि आलूचे दर मात्र स्थिर होते. लसूणमध्ये प्रतिकिलो ३० रुपयांनी वाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. यासह अद्रक ३० रुपये प्रतिकिलो, टाेमॅटो १०, हिरवी मिरची ४०, दोडकी व भेंडी ४०, सिमला मिरची ३०, पत्ताकोबी १५, फुलकोबी १५, वांगी २०, बरबटी व आवरा शेंग २०, मेथी व पालक १०, बीट ४० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री झाली.
.................
पालेभाज्यांचे दर सातत्याने कमी होत आहेत. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकात विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. डाळीचे दर मात्र वाढलेले आहेत. त्यातूनही दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे.
- सविता जाधव
गृहिणी
.................
गेल्या काही आठवड्यांपासून पालेभाज्यांच्या दरात घट झालेली आहे. हर्रासीमध्ये कमी दराने भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांचा फायदा होत आहे; परंतु शेतकरी व व्यावसायिकांना विशेष फायदा नाही.
- गोपाल इरतकर
भाजी विक्रेता
.................
कच्चा माल बाहेरून आणावा लागत असल्याने सफरचंद, डाळिंब, अंगूर, पपई यांसह इतरही फळांचे दर वाढलेले असतात. चालू आठवड्यात मात्र हे दर स्थिर आहेत. यामुळे ग्राहकांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
- रतन बागवान
फळ विक्रेता