मानाेऱ्यात समाजसेवी संस्थांकडून वसंतराव नाईक यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST2021-07-02T04:28:01+5:302021-07-02T04:28:01+5:30

महंत संजय महाराज यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले. गोर सेना तथा वसंतराव नाईक ...

Vasantrao Naik was honored by social organizations in Manera | मानाेऱ्यात समाजसेवी संस्थांकडून वसंतराव नाईक यांना आदरांजली

मानाेऱ्यात समाजसेवी संस्थांकडून वसंतराव नाईक यांना आदरांजली

महंत संजय महाराज यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले. गोर सेना तथा वसंतराव नाईक मित्र मंडळ मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने नाईकसाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम गुरुवारी शहरात आयोजित करण्यात आले.

आदरांजली कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, गोर सेना तालुका अध्यक्ष गोपाल राठोड, वसंतराव नाईक मित्र मंडळ अध्यक्ष नितीन राठोड, सरपंच प्रकाश जाधव, भाऊराव चव्हाण, नीळकंठ पाटील, खूपसे, मनोहर राठोड, प्रा. जय चव्हाण, पृथ्वीराज राठोड, श्याम राठोड, संतोष महाराज, शंकर राठोड, विशाल राठोड, रोशन चव्हाण, महेश राठोड हे व इतरही मान्यवर उपस्थित होते.

मानोरा तालुक्यात प्राथमिक शिक्षण झालेले वसंतराव नाईक राज्याच्या सर्वोच्च पदावर पोहोचून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याला सुजलाम-सुफलाम आणि प्रगतिपथावर आणण्यासाठी केलेल्या स्मृतींना उजाळा आदरांजली कार्यक्रमादरम्यान भाजप तालुका अध्यक्ष ठाकूर सिंग चव्हाण यांनी दिला. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी गोर सेना पदाधिकारी, कार्यकर्ते तथा वसंतराव नाईक मित्र मंडळाकडून विशेष परिश्रम घेण्यात आले.

Web Title: Vasantrao Naik was honored by social organizations in Manera