कारपा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST2021-08-12T04:46:50+5:302021-08-12T04:46:50+5:30

प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून ...

Various events on the occasion of World Tribal Day at Karpa | कारपा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कारपा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम

प्रथम क्रांतिवीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा पिवळा शेला व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विश्वनाथ शिकारे, अफ्रोट संघटनेचे मानोरा तालुकाध्यक्ष प्रा. बंडू भाऊ वाघमारे यांनी जागतिक दिन व आदिवासी संस्कृती, निसर्गपूजन यांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. आदिवासी गौरव दिनाची माहिती आनंद खुळे, विशाल डोलारकर, विकास लडके, ज्ञानेश्वर ढगे यांनी दिली.

नंतर शाळेतील, अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना उजळणी, बालचित्र पुस्तक, रजिस्टर व पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर मुंगसाजी महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यशस्वितेसाठी अभ्यासिकेचे विद्यार्थी व तरुण मंडळाने परिश्रम घेतले. आकाश बेले यांनी सूत्रसंचालन, तर प्रकाश खुळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title: Various events on the occasion of World Tribal Day at Karpa