शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:52 IST

MNS and Prahar Activist News मनसे व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली. 

कारंजा लाड : कारंजा पंचायत समितीअतंर्गत येत असलेल्या शहरातील शाळांनी प्रवेश व अन्य स्वरूपातील शुल्कासाठी मोठ्या प्रमाणात लूट चालविली आहे. अशा आशयाच्या पालकांच्या तक्रारीवरून ११ फेब्रुवारी रोजी मनसे व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली. कारंजा येथील एस.एन. चवरे विद्यालयात गौरवी भालचंद्र श्यामसुंदर, अश्विनी जाधव, गायत्री शिंदे या विद्यार्थ्यांना शुल्क न भरल्याने शाळेत बसू दिले नाही, अशी तक्रार संंबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसेकडे केली होती. मनसे तालुकाध्यक्ष अमोल लुलेकर, कपिल महाजन व प्रहार संघटनेचे महेश राऊत यांनी या प्रकाराचा जाब विचारासाठी शाळेत धडक दिली. त्यानंतर पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी उघडल्यानंतर तिथे जाऊन शिक्षणाच्या नावाखाली कारंजात सुरू असलेला प्रकार तसेच एस.एन. चवरे विद्यालयाकडून शुल्काच्या कारणावरून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार बंद करावा, असे म्हणत खुर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली. 

तक्रारीची दखल घेत शाळेत जाऊन चौकशी केली असता, शुल्क न भरल्याने कुठल्याही विद्यार्थ्यास बाहेर काढल्याचा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मनसे व प्रहार संघटनेकडून खुर्च्यांची व इतर साहित्यांची तोडफोड करणे योग्य नाही.- एस.एम. अघडतेगटशिक्षणाधिकारी, पं.स., कारंजा

विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आल्याची तक्रार करण्यात आली; मात्र असा प्रकार शाळेकडून आतापर्यंत झालेला नाही आणि पुढेही कधी होणार नाही. सदर शाळा शिक्षण क्षेत्रात नावाजलेली असल्याने कदाचित बदनाम करण्याचा हा प्रकार असू शकतो. - शशीकांत चवरेअध्यक्ष, शोभनाताई चवरे शाळा, कारंजा

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा