शेंदुरजना येथे लसीकरण जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:50+5:302021-04-05T04:36:50+5:30
लसीकरणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विविध स्वरूपातील अफवांमुळे सुरुवातीला लोकांचा लसीकरणास प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु हळूहळू चित्र बदलत ...

शेंदुरजना येथे लसीकरण जनजागृती अभियान
लसीकरणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विविध स्वरूपातील अफवांमुळे सुरुवातीला लोकांचा लसीकरणास प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु हळूहळू चित्र बदलत आहे. डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस पूर्ण सुरक्षित असल्याची खात्री लोकांना करून दिली. शेंदुरजना आढाव येथे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन लोकांना लस घेण्याचे आवाहन केले. आशा सेविका भारती पवार, रामराती यादव, मुक्ता पवार, सुरेखा भगत, सुशिला भगत, अंगणवाडी सेविका वेणू कापसे, शिला खिराडे, सुशिला पवार, सुजाता खिराडे, मंगला रबडे, चंद्रभागा ढगे, मीरा खिराडे, रेखा खडसे, पल्लवी गवई, फुला साखरे, सरपंच पूजा काळे, पोलीसपाटील कैलास घाटे, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आणि बी. एल. ओ. अशोक काळे, पडवाल, पाचपोर, तलाठी ए. पी. सावंगेकर, राजू आमटे, गणेश काळे, विश्वनाथ काळे, राजेश काळे, सुधाकर सोनोने आदीनी या रॅलीत सहभागी होऊन कोविड-१९ लसीकरणाची माहिती लोकांना दिली.
.........
कोट:
शेंदुरजना येथे कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित असून, सोमवार ते शनिवारपर्यंत आरोग्य केंद्रात ही लस देण्यात येत आहे. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांनी ही लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे.
- डॉ. अनिल अढाव
वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र शेंदुरजना (अ)