जिल्ह्यात एकाच दिवशी ९९४३ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:25 IST2021-07-03T04:25:49+5:302021-07-03T04:25:49+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा ...

Vaccination of 9943 persons in a single day in the district | जिल्ह्यात एकाच दिवशी ९९४३ जणांचे लसीकरण

जिल्ह्यात एकाच दिवशी ९९४३ जणांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्याकरिता लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोसही दिला जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

..........................

दुसऱ्या डोससाठी ऑनलाइन नोंदणीची आवश्यकता नाही

जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, पहिल्या डोससाठी येताना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ‘कोविन’ ॲपवर नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिक तसेच दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्रावर यावे व लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Vaccination of 9943 persons in a single day in the district