पदे रिक्त; कामकाज प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST2021-06-20T04:27:17+5:302021-06-20T04:27:17+5:30

रस्ता अरुंद; वाहतूक प्रभावित मालेगाव : मालेगाव शहरातील अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्याकडेला ऑटो, दुचाकी वाहनांचे पार्किंग केली जात ...

Vacancies; Functioning affected | पदे रिक्त; कामकाज प्रभावित

पदे रिक्त; कामकाज प्रभावित

रस्ता अरुंद; वाहतूक प्रभावित

मालेगाव : मालेगाव शहरातील अरुंद रस्ते आणि त्यातच रस्त्याकडेला ऑटो, दुचाकी वाहनांचे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. मालेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाही.

अनुदान मिळेना; लाभार्थी अडचणीत!

वाशिम : रमाई आवास योजनेंतर्गत कवठा जिल्हा परिषद गटातील जवळपास २० लाभार्थींना गतवर्षातील अनुदान अद्याप मिळाले नाही. परिणामी, घरकुलांची कामे प्रभावित झाली असून, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लाभार्थींनी गुरुवारी केली.

लाईनमन मुख्यालयी राहण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजासह परिसरातील इतर काही गावांमध्ये अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत आहे. लाईनमन नसल्याने समस्या सुटत नसून, त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.

रस्ता दुभाजक उभारण्याची मागणी

वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर वाहतुकीची नियमित वर्दळ राहते. चारही दिशांनी दिवसभर वाहने सुसाट वेगात धावतात. यामुळे मुख्य चाैकात दर्जेदार दुभाजक उभारण्यात यावेत, अशी मागणी प्रमोद बनसोड यांनी केली आहे.

सौरऊर्जा वापराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जा वापरावर भर देण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र प्रशासकीय कार्यालयांमध्येच त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण

वाशिम : वनविभागाच्या जमिनीवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून, काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.

वाहतूक विस्कळीत

वाशिम : पाटणी चौक व रिसोड नाका येथे विशेषत: सकाळच्यासुमारास वाहतूक विस्कळीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

जऊळका-मालेगाव रस्त्याची दुरवस्था

वाशिम : जऊळका रेल्वे ते मालेगाव येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून हाेत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर माेठे खड्डे पडले आहेत. संबंधितांनी याकडे लक्ष पुरवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Vacancies; Functioning affected