रंगोत्सवात नैसर्गिक रंगांचा वापर करा
By Admin | Updated: March 6, 2015 01:54 IST2015-03-06T01:54:03+5:302015-03-06T01:54:03+5:30
विद्यार्थ्यांंसह सामाजिक संघटनेच्यावतीने जनजागृती.

रंगोत्सवात नैसर्गिक रंगांचा वापर करा
वाशिम : होळी सणानिमित्त रंगोत्सवात रासायनिक रंगांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करीत नैसर्गिक रंग निर्मिती व वापराबाबत विविध सामाजिक संघटनांसह विद्यार्थ्यांंच्यावतीने जिल्हय़ात जनजागृती करण्यात आली. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाचीही साथ लाभली. रंगोत्सवात नैसर्गिक रंगांचा वापर करा व त्वचेचे संरक्षण करा, असा नारा विद्यार्थ्यांंंच्यावतीने देण्यात येत आहे. रासायनिक रंगांच्या वापराने मानवी शरीरावर परिणाम होत असल्याने पर्यावरणपूरक रंगांची उधळून करून धूलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले आहे. रंगोत्सवानिमित्त स्थानिक एसएमसी स्कूल, हरित सेना पथक, बाकलीवाल विद्यालय वाशिम, मानोरा येथील व.ना. महाविद्यालय, युवा मित्र, राजरत्न संस्था, युवा मंडळ, मारवाडी युवा मंच, छावा संघटना, अपंग विकास महामंडळासह विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन नैसर्गिक रंगांची उधळण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांंनी नैसर्गिक रंग बनविण्याचा पद्धतीची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविले. नैसर्गिक रंग बनविण्याच्या पद्धती एसएमसी स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व शिक्षक अभिजित जोशी, मानोरा येथील वसंतराव नाईक विद्यालय येथे राष्ट्रीय हरित सेना ह्यवनराई इको क्लबह्ण द्वारा आयोजित ह्यखेलो होली इको फ्रेन्डलीह्ण या कार्यक्रमांतर्गत जनजागरण करण्यासाठी विद्यार्थ्यांंंना रासायनिक रंग टाळा, नैसर्गिक रंग खेळा, असा संदेश राष्ट्रीय हरित सेनचे प्रभारी शिक्षक अनंत खडसे संदेश दिला. रासायनिक रंगाचा त्वचेवर, चेहर्यावर विपरीत परिणाम होतो. रंग डोळ्यात गेला, तर अंधत्व येण्याचा धोकाही नाकारता येत नाही.