कुपटा-हट्टी रस्ता कामात अवैध गौण खनिजाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST2021-03-04T05:19:19+5:302021-03-04T05:19:19+5:30
, तक्रार करुणही चौकशी नाही मानोरा : तालुक्यातील कुपटा-हट्टी या रस्त्याचे काम पीएमजेएसवाय ग्राम सडक योजनेतून ...

कुपटा-हट्टी रस्ता कामात अवैध गौण खनिजाचा वापर
, तक्रार करुणही चौकशी नाही
मानोरा : तालुक्यातील कुपटा-हट्टी या रस्त्याचे काम पीएमजेएसवाय ग्राम सडक योजनेतून करण्यात येत असून सदर रस्ता कामात वापरण्यात येणारे गौण खनिज अवैधरीत्या शासन कर न भरता विना राँयल्टी दिशाभूल करुत मंगरुळपीर येथील राँयल्टी दाखवून मानोरा येथील गौण खनिजांचे वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
सदर कामात वापरण्यात आलेल्या गौण खनिजाची चौकशी करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी स्थानिक तहसील प्रशासनाला करुनही कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी कुठे तरी मुरते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
निसर्गाच्या संवर्धनासाठी शासनाच्यावतीने वेगवेगळी उपाययोजना आखत मोठ्या जोमाने चालविल्या जात असताना दुसरीकडे शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्या जात आहे.
कुपटा ते हट्टी ह्या रोडच्या कामाची तक्रार आली आहे, संबधित ठेकेदार यांनी रॉयल्टी भरली आहे. रॉयल्टी जिल्ह्यातील कुठलीही चालते मात्र ती मुदतबाह्य असू नये. तरीही याबाबत चौकशी केल्या जाईल.
संदेशकुमार किर्दक
,
नायब तहसिलदार, मानोरा.