अनधिकृत ‘क्लिनिकल लॅब’ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:04 IST2020-12-26T18:04:14+5:302020-12-26T18:04:23+5:30
Clinicla Lab News याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता अधिक असल्याचे विश्वसनयी सूत्रांनी सांगितले.

अनधिकृत ‘क्लिनिकल लॅब’ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल होणार
वाशिम : वाशिम शहरातील सहा ‘क्लिनिकल लॅब’धारकांकडे विद्यापीठ अनुदान आयोगाची अथवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या डीएमएलटी पदविका आढळून न आल्याने उपरोक्त लॅब चालवित असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या चौकशीतून स्पष्ट झाले. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
‘क्लिनिकल लॅब’ चालविण्यासाठी शासन नियमानुसार सर्व प्रमाणपत्र व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. शहरातील सहा ‘क्लिनिकल लॅब’धारकांसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी संबंधितांना नोंदणीकृत कागदपत्रांसह जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय वाशिम येथे बोलाविले होते. यावेळी आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शासन नियमानुसार पुढील कायर्वाही होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी १७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती याप्रकरणी कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागून आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता अधिक असल्याचे विश्वसनयी सूत्रांनी सांगितले.