उंबर्डाबाजारवासीयांनी पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: May 7, 2017 13:32 IST2017-05-07T13:32:45+5:302017-05-07T13:32:45+5:30
इंदिरानगर झोपडपट्टमधील नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी इंदिरानगरवासीयांच्यावतीने करण्यात आली आहे.

उंबर्डाबाजारवासीयांनी पाण्यासाठी भटकंती
उंबर्डाबाजार : अनियमित विज पुरवठ्याचा फटका पाणी पुरवठा योजनेला बसत असल्याने ग्राम उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टीवासीयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. मात्र या प्रकाराक डे ग्रामपचांयत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
येथील इंदिरा नगर झोपडपट्टीमध्ये मध्ये तीन हातपंप असून पैकी तीनही हातपंप सध्यास्थितीत बंद असुन पाण्यासाठी एकही सार्वजनिक विहीर नाही तसेच आठ ते दहा दिवसानंतर इंदिरा नगरमधील कॉलचा नंबर येत असल्याने इंदिरानगरवासीयांना तळपत्या उन्हात पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक नळावर गर्दी करावी लागते. अनेकदा नंबरसाठी वादविवाद सुध्दा होतात तरी ग्रमपंचायत प्रशासनाने इंदिरानगर झोपडपट्टमधील नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी इंदिरानगरवासीयांच्यावतीने करण्यात आली आहे.