सावरगाव येथे दोन महिलांचा विनयभंग!
By Admin | Updated: May 15, 2017 19:42 IST2017-05-15T19:42:07+5:302017-05-15T19:42:07+5:30
मानोरा (वाशिम) : स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे एकाच दिवशी दोनठिकाणी घडलेल्या वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला.

सावरगाव येथे दोन महिलांचा विनयभंग!
मानोरा (वाशिम) : स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे एकाच दिवशी दोनठिकाणी घडलेल्या वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध १५ मे रोजी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विवाहित महिला १४ मे रोजी घरी एकटी असताना आरोपी बलदेव किसन राठोड याने घरात प्रवेश करून पिण्याचे पाणी मागितले. तसेच वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. अशा पिडित महिलेच्या फिर्यादीहून मानोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४५२, ३५४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत ३० वर्षीय फिर्यादी महिला घरात एकटी असताना आरोपी भरोष शेषराव चव्हाण याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला; तर विनोद सकस राठोड, सुभाष सिताराम चव्हाण (रा.वागद तांडा) यांनी घटनेची वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी तीनही आरोपींविरूद्ध कलम ३५४, ५५६, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही घटनांचा तपास बिट जमादार विजय जाधव, दिगांबर राठोड करित आहेत.