दुचाकीस्वारास जीपने उडविले!
By Admin | Updated: June 1, 2017 01:56 IST2017-06-01T01:56:40+5:302017-06-01T01:56:40+5:30
मानोरा : क्रूझर जीपने दुचाकीस्वारास उडविल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगव्हाण गावाजवळ घडली. यामध्ये दुचाकीस्वार चव्हाण यांना जबर मार लागला.

दुचाकीस्वारास जीपने उडविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : क्रूझर जीपने दुचाकीस्वारास उडविल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगव्हाण गावाजवळ घडली. यामध्ये दुचाकीस्वार चव्हाण यांना जबर मार लागला.
हळदा येथील चव्हाण हे ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास एमएच ३७ डी ५३५६ क्रमांकाच्या दुचाकीने मानोरा येथे बाजारासाठी येत होते, तर मानोरा येथून क्रूझर जीप मंगरुळपीरकडे भरधाव जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूझरने चव्हाण यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये चव्हाण यांच्या हात व एका पायाला जबर दुखापत झाली. तसेच छातीलादेखील इजा झाली
घटनेची माहिती मिळताच यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पुढील उपचारार्थ त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी मानोरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.