वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:18 IST2017-09-18T19:17:34+5:302017-09-18T19:18:02+5:30
रिसोड तालुक्यातील गोवर्धना-मांगूळझनक रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात २७ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. परमेश्वर वाघ रा. गोवर्धना असे मृतकाचे नाव आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (वाशिम): रिसोड तालुक्यातील गोवर्धना-मांगूळझनक रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात २७ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. परमेश्वर वाघ रा. गोवर्धना असे मृतकाचे नाव आहे.
परमेश्वर वाघ हे दुचाकीने रविवारी रात्रीदरम्यान गोवर्धना ते मांगूळ झनक या रस्त्यावरून येत होते. दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने परमेश्वर वाघ या युवकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा चुलत भाऊ बाबासाहेब रुस्तमराव वाघ यांनी १८ सप्टेंबर रोजी शिरपूर पोलीस स्टेशन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरूद्ध भादंवी कलम २७९, ३०४ अ, मुंबई मोटार वाहन अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ दामोदर इप्पर करीत आहेत.