प्राणघातक हल्ल्यातील दोघे अटकेत

By Admin | Updated: September 26, 2016 03:11 IST2016-09-26T03:11:50+5:302016-09-26T03:11:50+5:30

डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटनेतील दोन फरार आरोपींना अटक.

Two of the victims were killed in the attack | प्राणघातक हल्ल्यातील दोघे अटकेत

प्राणघातक हल्ल्यातील दोघे अटकेत

अकोला, दि. २५- डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलजारपुरा, फुकटपुरा येथील अब्दूल नईम अब्दूल जावेद या इसमावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दोन आरोपींना डाबकी रोड पोलिसांनी अटक केली. या दोन आरोपींना अटक केली असली, तरी एक आरोपी अद्यापही फरार आहे.
फुकटपुरा येथील रहिवासी एका इसमावर हबीबनगर येथील रहिवासी अ. शफीक अ. रउफ, अ. रउफ अ. रफीक आणि त्यांच्या एका साथीदाराने धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल केले. सदर इसमाची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्याच्यावर हल्ला करणारे तीनही आरोपी फरार झाले होते.
यामधील हबीबनगर येथील रहिवासी अ. शफीक अ. रउफ, अ. रउफ अ. रफीक या दोन आरोपींना रविवारी अटक करण्यात आली असून, तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. अलिकडच्या काही दिवसांत शहरात हाणामारी व खुनाचे प्रकार घटल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Two of the victims were killed in the attack