ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी
By नंदकिशोर नारे | Updated: April 1, 2024 16:15 IST2024-04-01T16:15:08+5:302024-04-01T16:15:23+5:30
दोघांच्याही पायांना गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.

ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी
नंदकिशाेर नारे, वाशिम : ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १ एप्रिलला सकाळी १० वाजता कारंजा ते दारव्हा मार्गावरील मंगरूळ वेशजवळ घडली. गुरू शांतीनाथ महाराज (६२) व मनीय जयराम खरडकर (६५) अशी जखमींची नावे असून, ते दोघेही अमरावती जिल्ह्यातील लोहगाव येथील रहिवासी आहेत.
गुरू शांतीनाथ महाराज व मनीय जयराम खरडकर हे दोघे दुचाकीवरून लोहगाव येथून वाशिमजवळील धानोरा येथे जात होते. कारंजा ते दारव्हा मार्गावरील मंगरूळ वेशजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. त्यामुळे ते दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकाचालक शंकर रामटेके यांनी त्यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, दोघांच्याही पायांना गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे जाण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.