शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर ट्रक व बोलेरो अपघातात दोन जण जखमी

By नंदकिशोर नारे | Updated: April 7, 2024 13:25 IST

लासलगावहून नागपूरकडे कांदा घेऊन जाणारा डब्ल्यु.बी. ३३ इ ९९५९ क्रमांकाचा ट्रक सकाळी ५.३० वाजता पलटी झाला.

वाशिम :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका चालूच असून ७ एप्रिल रोजी सकाळी ट्रक व बोलेरो पिकपचा अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथिल ओव्हरब्रिज जवळ घडली. 

लासलगावहून नागपूरकडे कांदा घेऊन जाणारा डब्ल्यु.बी. ३३ इ ९९५९ क्रमांकाचा ट्रक सकाळी ५.३० वाजता पलटी झाला. पलटी झालेला ट्रक ओव्हर ब्रिजसमोर असल्याने मागुन येत असलेल्या एम.एच. १६ सी.डी. ४९०९ या ट्रकने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव वेगाने नाशिकहून नागपूरकडे द्राक्षे घेऊन जाणारी एम.पी. २० जी.बी ६५८८ क्रमांच्या  बोलेरो पिक गाडीने ट्रकला मागुन जोरदार धडक दिली. 

यामुळे द्राक्ष वाहतूक करणाऱ्या गाडीतील चालक व वाहक घनश्याम पटेल (२५), राजा अहिरवल  (२१) गंभीररीत्या जखमी झाले आहे. तसेच कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील चालकालाही किरकोळ मार लागला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीम व पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहीकेच्या साह्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Accidentअपघात