अपघातात दोन जण जखमी
By Admin | Updated: June 5, 2017 19:05 IST2017-06-05T19:05:25+5:302017-06-05T19:05:25+5:30
कामरगाव : येथुन जवळच असलेल्या विळेगाव फाट्याजवळ कार व टाटा एसी या वाहनाचा अपघात झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.

अपघातात दोन जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : येथुन जवळच असलेल्या विळेगाव फाट्याजवळ कार व टाटा एसी या वाहनाचा अपघात झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.
एम.एच.३७ बी २३५९ क्रमांकाचे टाटा एसी वाहन कामरगावरुन कारंजाकडे जात होते. तर सीजी ०७ बीई ५९१७ क्रमांकाची कारदेखील कारंजाकडे जात होती. विळेगाव फाट्याजवळ या दोन्ही वाहनांत अपघात झाल्याने टाटा एसीचे चालक व अन्य एक जण रवी किर्दक हे जखमी झाले. त्यांच्यावर कामरगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ अमरावती येथे हलविण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल गहु यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन कदम करीत आहेत. टाटा एसी या वाहनाने विक्रीकरीता म्हैस नेली जात होती.