आणखी दोघांचा मृत्यू, ५१ पॉझिटिव्ह; ७९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:39 IST2020-09-29T12:39:40+5:302020-09-29T12:39:46+5:30
आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

आणखी दोघांचा मृत्यू, ५१ पॉझिटिव्ह; ७९ कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. आतापर्यंत कोरोनाने ८५ जणांचा बळी गेला. दरम्यान सोमवारी दिवसभरात ५१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आता तर ७९ जणांनी कोरोनावर मात केली. आता एकूण रुग्णसंख्या ४१७४ वर पोहचली.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. सोमवारी दिवसभरात ५१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील २, काळे फाईल येथील २, गणेशपेठ येथील १, लाखाळा येथील ३, जैन मंदिर परिसर १, अकोला नाका परिसर १, बसस्थानक परिसर १, मोहजा रोड येथील १, कार्ली येथील १, मालेगाव शहरातील ८, मैराळडोह येथील १, इराळा येथील १, मारसूळ येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, एकता नगर येथील १, शासकीय रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील २, अनंत कॉलनी परिसरातील ५, शहरातील इतर ठिकाणचा १, लोणी फाटा येथील १, देगाव येथील ३, हराळ येथील १, रिठद येथील १, लोणी येथील २, व्याड येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील सार्सी येथील १, कारंजा लाड शहरातील महसूल कॉलनी परिसरातील १, इतर ठिकाणचा १, धनज बु. येथील १, खेर्डा बु. येथील १ अशा एकूण ५१ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४१७४ वर पोहोचली असून, त्यातील ८५ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ३४१४ लोक बरे झाले. दरम्यान, सोमवारी दिवसभरा ७९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली.