Two more death in Washim district; 20 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी दोन जणांचा मृत्यू; २० कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी दोन जणांचा मृत्यू; २० कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी मृत्यूसत्र कायम असल्याचे दिसून येते. आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी घेण्यात आली. दरम्यान मंगळवारी २० जणांचा कोरोना  चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ५८ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत असला तरी  मृत्यूसत्र कायम असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्ल्याची नोंद मंगळवारी झाली असून आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी दिवसभरात २० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी परिसर १, सिव्हील लाईन्स १, अनसिंग येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील फाळेगाव ६, सनगाव २, आसेगाव येथील ३, सार्सी येथील १, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही १, कारंजा लाड शहरातील शिवाजी नगर येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, तसेच इतर ठिकाणची १ अशा २० जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६३९ झाली. यापैकी आतापर्यंत ५०१५ जण बरे झाले. ५८ जणांना डिस्चार्ज जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री   रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हाॅस्पिटल अशा ठिकाणी उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील एकूण ५८ जणांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: Two more death in Washim district; 20 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.