मंगरूळपिरात गृहोद्योग समुहाकडून दोन लाखांचे प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:25 PM2019-11-01T15:25:30+5:302019-11-01T15:25:36+5:30

पत्रावळी व द्रोण तयार करण्यासाठीचा दोन लाख रुपयांचा प्लास्टिकचा कच्चा माल आढळून आला.

Two lakh plastics seized from in Mangarulpar | मंगरूळपिरात गृहोद्योग समुहाकडून दोन लाखांचे प्लास्टिक जप्त

मंगरूळपिरात गृहोद्योग समुहाकडून दोन लाखांचे प्लास्टिक जप्त

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहरातील एका गृहोद्योग समुहाकडून नगर पालिकेच्या पथकाने गुरूवार, ३१ आॅक्टोबर रोजी सुमारे दोन लाख रुपयांचे प्लास्टिक जप्त केले. सोबतच तरतुदीनुसार पाच हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशावरून पथकाने मंगलधाम येथील आई तुळजाई गृहोद्योग येथे तपासणी केली असता त्याठिकाणी पत्रावळी व द्रोण तयार करण्यासाठीचा दोन लाख रुपयांचा प्लास्टिकचा कच्चा माल आढळून आला. तसेच पत्रावळी व द्रोण बनविण्याची मशीनही आढळली.पथकाने सदरचा कच्चा माल जप्त करून गृहोद्योगाचे संचालक सुजीत राठोड यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. सदरची कारवाई नगर परिषद अभियंता सोनाली खडीकर, आरोग्य निरीक्षक राजेश संगत, गजानन घवळे, शफी अहेमद, रामजी मिसाळ, विजय नागलकर, भास्कर गुंजकर, गजानन श्रृंगारे, सुरज संगत यांनी केली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two lakh plastics seized from in Mangarulpar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.