अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST2021-04-14T04:37:46+5:302021-04-14T04:37:46+5:30

वाशिम : येथील वाशिम ते हिंगोली महामार्गावरील विठ्ठल कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ दुचाकीला ट्रेलरने धडक दिल्याने दोन जण जागीच ...

Two killed on a two-wheeler in an accident | अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

वाशिम : येथील वाशिम ते हिंगोली महामार्गावरील विठ्ठल कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ दुचाकीला ट्रेलरने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्रीदरम्यान घडली.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील राहुल सुधाकर बानकर (२०) व फिरदौस अ. कय्यूम (१९) हे दोघे हिंगोलीकडून वाशिमकडे येत असताना आर.जे. ०२ जीबी-५६२७ या क्रमाकांच्या ट्रेलरने एम.एच. ३७ एक्स-३८७५ या क्रमाकांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात राहुल बानकर व फिरदोस कयूम हे दोघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवून अपघातग्रस्त वाहन जमा केले. याप्रकरणी ट्रेेलर चालकाविरुद्ध भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two killed on a two-wheeler in an accident