वेगवेगळय़ा अपघातात दोन ठार

By Admin | Updated: August 14, 2014 02:06 IST2014-08-14T01:49:37+5:302014-08-14T02:06:18+5:30

कारंजा व वाशिम येथील घटना

Two killed in a different accident | वेगवेगळय़ा अपघातात दोन ठार

वेगवेगळय़ा अपघातात दोन ठार

कारंजा /वाशिम : मंगरुळपीर रस्त्यावर आदर्श अध्यापक विद्यालयाजवळ रोही आडवा आल्यामुळे तर वाशिम तालुक्यातील काटा रोडवर मोटारसायकलवरील ताबा सुटल्यामुळे या दोन अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.
कारंजा येथील लघु सिंचन विभाग २ कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे मंगरुळपीर येथील रहिवासी बाळासाहेब श.महाकाळ हे मंगरुळपीर येथून कारंजाकडे येत असताना आदर्श अध्यापक विद्यालयाजवळ मोटारसायकलच्या रोही वन्यप्राणी आडवा आल्यामुळे त्यांचा जबर अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील विनोद कुंडलीक इंगोले हा युवक १२ ऑगस्ट रोजी रात्रीचे वेळी मोटारसायकलने वाशिमहून आपल्या गावी परत जात होता. दरम्यान, काटा मार्गावर असलेल्या बाकलीवाल यांचे शेताजवळील त्याचा मोटारसायकलच्या स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या काठावर असलेल्या दगडावर जाऊन मोटारसायकल आदळली. या अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात रात्री नेमका किती वाजता घडला, याची माहिती मिळू शकली नाही. १३ ऑगस्ट रोजी सकाळचे सुमारास एका शेतकर्‍याला अपघात होऊन इसम ठार झाल्याचे दिसून आले.

Web Title: Two killed in a different accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.