किटकनाशक फवारणीनंतर दोन जण अस्वस्थ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:40 IST2017-10-22T22:39:55+5:302017-10-22T22:40:38+5:30
कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून जवळच असलेल्या तथा मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील माटोडा येथील दोन जणांना किटकनाशकाच्या फवारणीनंतर अस्वस्थ वाटु लागल्याने रविवारी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. येथे प्रथमोपचार केल्यानंतर दोघांनाही अमरावती येथील सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले.

किटकनाशक फवारणीनंतर दोन जण अस्वस्थ !
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथून जवळच असलेल्या तथा मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील माटोडा येथील दोन जणांना किटकनाशकाच्या फवारणीनंतर अस्वस्थ वाटु लागल्याने रविवारी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. येथे प्रथमोपचार केल्यानंतर दोघांनाही अमरावती येथील सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले.
माटोडा येथील अरविंद किसन कांबळे (२७) व राजेश पंजाबराव ढोरे (३५) हे तूर या पिकावर फवारणी करुन घरी परत आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटु लागले. तपासणीसाठी त्यांना कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता, येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारार्थ या दोघांनाही अमरावती येथे हलविण्यात आले. पुढील तपास मूर्तिजापूर पोलिस करीत आहेत.