शौचालय बांधकामासाठी दोन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:30 IST2021-02-05T09:30:04+5:302021-02-05T09:30:04+5:30

०००००००० संदिग्ध रुग्णांची आरोग्य तपासणी इंझोरी : इंझोरी येथील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल २२ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर ...

Two day period for construction of toilets | शौचालय बांधकामासाठी दोन दिवसांची मुदत

शौचालय बांधकामासाठी दोन दिवसांची मुदत

००००००००

संदिग्ध रुग्णांची आरोग्य तपासणी

इंझोरी : इंझोरी येथील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल २२ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर संदिग्ध रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.

००००

तूर उत्पादक शेतकरी अडचणीत

धनज बु. : विविध कारणांमुळे यंदा धनज परिसरातील शेतकऱ्यांच्या तुरीच्या एकरी उत्पादनात घट येत आहे. एकरी २ ते ३ क्विंटलचा उतार येत असून, यामुळे लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

०००

शाळेमध्ये विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती

उंबर्डा बाजार : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले असून, पहिल्या दिवशी उंबर्डाबाजार परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती दिसून आली. तपासणी करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

००००००

घरकूल अनुदान केव्हा मिळणार?

पोहरादेवी : रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या परिसरातील १५ ते २० लाभार्थींना अद्याप अनुदान मिळाले नाही. अनुदान केव्हा मिळणार? याकडे लाभार्थींचे लक्ष लागून आहे.

००००

रोहित्र नादुरुस्त; शेतकरी त्रस्त

केनवड : केनवड परिसरातील विद्युत रोहित्राचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला नाही. नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्यास विलंब होत असल्याने सिंचन प्रभावित होत आहे. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी माजी जि. प. सभापती सुधीर पाटील गोळे यांनी बुधवारी केली.

००००

सरपंच पदासाठी फिल्डिंग

रिठद : रिसोड तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून रिठदची ओळख आहे. सरपंच पदाचे आरक्षण कोणते जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष असून, प्रत्येक जण आपापल्या परीने सरपंच पदासाठी फिल्डिंग लावत असल्याचे दिसून येते.

००००००००००००

Web Title: Two day period for construction of toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.