शेलुबाजार येथे एकाच रात्री दोन चो-या

By Admin | Updated: October 29, 2014 01:30 IST2014-10-29T01:30:20+5:302014-10-29T01:30:20+5:30

भरचौकातील दुकाने फोडल्या गेलीत; तपास मात्र शुन्य.

Two choices at one night in Selbuazar | शेलुबाजार येथे एकाच रात्री दोन चो-या

शेलुबाजार येथे एकाच रात्री दोन चो-या

मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील शेलूबाजार येथील मंगरूळपीर रोड असलेल्या शिवम कृषी सेवा केंद्र व गणेश ऑटो मोबाईल्समध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम लंपास केल्याची घटना २७ च्या रात्री घडली. शेलूबाजार शिवम कृषी सेवा केंद्राच्या मागील बाजूला असलेल्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील रोख ६ हजार ३00 रुपये लंपास केले तर नजीकच्याच सेवा सहकारी सोसायटी शॉपींगमधील गणेश अाँटो मोबाईल्समधील ३ हजार २५0 रूपयांचा गल्ला साफ केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेलूबाजारात आतापर्यंत अनेक घरफोड्या झाल्या. भरचौकातील दुकाने फोडल्या गेली; मात्र एकाही चोरीचा तपास पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे व्यापारी वर्गात पोलिसांच्या कारवाईप्रति रोष निर्माण होत आहे. स्थानिक पोलिस कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर न जाता नागपूर ते औरंगाबाद द्रूतगती मार्गावरील वाहनाची तपासणी करण्यातच धन्यता मानत असल्याची ओरड आहे. याकडे पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Two choices at one night in Selbuazar