ट्रकचोरांना रंगेहात पकडले

By Admin | Updated: August 7, 2014 23:54 IST2014-08-07T23:54:03+5:302014-08-07T23:54:03+5:30

ट्रक चोरणार्‍या सहा जणांना रंगेहाथ पकडल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी घडली.

The truckers caught in a tinkle | ट्रकचोरांना रंगेहात पकडले

ट्रकचोरांना रंगेहात पकडले

डोणगाव : तालुक्यातील लोणी गवळी ते लावणा रस्त्यावरील गिट्टी खदानजवळ ट्रक चोरणार्‍या सहा जणांना रंगेहाथ पकडल्याची घटना ७ ऑगस्ट रोजी घडली.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, जालना येथून शंकर शामराव जाधव यांचा एम.एच.२१ एक्स३२८८ क्रमांकाचा ट्रक ५ ऑगस्ट रोजी चोरी गेला होता. त्यानंतर सदर ट्रक लोणीगवळी ते लावणा रस्त्यावरील गिट्टी खदानजवळ ६ ऑगस्टच्या रात्रीदरम्यान तोडणे सुरु होते. याची गुप्त माहिती बुलडाणा पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ डोणगाव पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर बुलडाणा व डोणगाव येथील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असता त्यांना ट्रक चोरटे ट्रकचे भाग वेगवेगळे करतांना मिळून आले. ट्रक चोरट्यांमध्ये मेहकर येथील शे.मोबीन शे.यासीन, शे.वसीम शे.यासीन, शे.इम्रान शे.उस्मान, सुभान फकीरा गवळी, जुबेरखान सरदार खान, तर डोणगाव येथील गजानन यादव विडोळे या सहा जणांचा समावेश आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिस तपास सुरु होता.

Web Title: The truckers caught in a tinkle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.