ट्रक व ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार, एक गंभीर
By Admin | Updated: June 21, 2014 00:34 IST2014-06-21T00:24:25+5:302014-06-21T00:34:07+5:30
किन्हीराजा-मालेगाव मार्गावर एका ट्रक व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार; एक गंभीर

ट्रक व ट्रॅक्टरच्या धडकेत एक जण ठार, एक गंभीर
किन्हीराजा : किन्हीराजा ते मालेगाव मार्गावर एका ट्रक व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभिर जखमी झाल्याची २0 जून रोजी सकाळी १ १.३0 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार येथील रहिवाशी शरद निळकंठ तायडे व त्याचे वडील निळकंठ तायडे हे दोघे एम.एच. ३७ एफ २४९८ या क्रमांकाचा ट्रॅक्टर घेवून शेतातील कामे आटोपून घराकडे परत येत होते. दरम्यान मालेगाववरुन भरधाव येणार्या एम.एच. ४0 वाय ८८४0 या ट्रकने त्यांच्या ट्रॅक्टरला समोरासमोर धडक दिली. या अपघातात निळकंठ संपत तायडे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक शरद निळकंठ तायडे गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच जमादार कैलास राठोड व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीसांनी पंचनामा केला.