तूर घेऊन जाणारा ट्रक उलटला; चार तास वाहतूक ठप्प!
By Admin | Updated: May 8, 2017 04:19 IST2017-05-08T01:38:19+5:302017-05-08T04:19:32+5:30
गोलवाडी फाट्यानजिकची घटना; सुदैवाने जिवीतहानी टळली!

तूर घेऊन जाणारा ट्रक उलटला; चार तास वाहतूक ठप्प!
वाशिम : येथून कानपूरकडे तूरीचा माल घेऊन जाणारा ट्रक गोलवाडी (ता.मंगरूळपीर) फाट्यानजिक उलटला. रविवार, ७ मे रोजी सकाळी १0.३0 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्या मधोमध ट्रक आडवा झाल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वाशिमवरून कानपूरकडे तूर घेवून जाणारा ट्रकला (क्रमांक एम.पी.0७ एच.बी. ५८५३) समोरून भरधाव वेगात येणार्या वाहनाने कावा मारला. यावेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने भारीभरकम स्वरूपातील हा ट्रक रस्त्यावर उलटून आडवा झाला. हा अपघात एवढा भीषण होता, की ट्रकचा समोरचा भाग चकनाचूर झाला. या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक तब्बल चार तास खोळंबली होती. त्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात तारांबळ उडाली.
मंगरूळपीर पोलीस घटनेबाबत अनभिज्ञ
रविवारी सकाळी १0.३0 वाजता घडलेल्या या घटनेबाबत मंगरूळपीर पोलिसांना सायंकाळी उशीरापर्यंतही माहिती नव्हती. ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीने यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला असता, पोलिस याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.