ट्रक व जीप अपघात; एक ठार

By Admin | Updated: June 28, 2014 01:41 IST2014-06-28T00:55:46+5:302014-06-28T01:41:34+5:30

मालेगाव-मेहकर रस्त्यावरील घटना

Truck and jeep accident; One killed | ट्रक व जीप अपघात; एक ठार

ट्रक व जीप अपघात; एक ठार

मालेगाव: मालेगाव- मेहकर रोडवरील वडप टोलनाक्याजवळ ट्रक व मोटारसायकलची भीषण धडक झाल्याने या अपघातामध्ये एक इसम ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २७ जूनच्या दुपारी ४ वाजता घडली.
पांगरी कुटे येथील विठ्ठल सोपान कुटे व सचिन सुभाष कव्हर हे त्यांच्या एम.एच.३७ सीपी ६१६४ क्रमांकाच्या मोटार सायकलने वडप येथून मालेगावकडे येत असतांना मालेगाव वरुन मेहकरच्या दिशेने जात असलेल्या एम.एच.१४ सी.पी.५५६७ या क्रमांकाच्या ट्रकने वडप जवळ त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
त्यामध्ये डोक्याला गंभीर मार लागल्याने सचिन सुभाष कव्हर हा जागीच ठार झाला. तर विठ्ठल सोपान कुटे यांना गंभीर मार लागल्याने प्राथामिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ट्रक चालकाने ट्रक तेथेच सोडून घटनास् थळावरुन पसार झाला. या प्रकरणी पांगरी कुटे येथील रमेश तुकाराम कुटे यांनी मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदविली होती. परंतु हे वृत्त लिहे पर्यंत मालेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला नव्हता.

Web Title: Truck and jeep accident; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.