सुकामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

By Admin | Updated: April 26, 2017 02:42 IST2017-04-26T02:42:07+5:302017-04-26T02:42:07+5:30

मारवाडी युवा मंचचा उपक्रम : पादचाऱ्यांनीही थांबून वाहिली श्रद्धांजली

Tribute to the soldiers who were martyred at Sukama | सुकामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

सुकामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली

वाशिम: नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना स्थानिक पाटणी चौकात २५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मारवाडी युवा मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मेणबत्त्या व दिवे लावून दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महार रेजिमेंटचे एक्समॅन नायब सुभेदार तथा बोरगावमंजू येथील रहिवासी सी.एम. सुरडकर यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनीष मंत्री, सचिव संजोगकुमार छाबडा, कोषाध्यक्ष उमेद खंडेलवाल, निवर्तमान अध्यक्ष नीलेश राठी, ओम बनभैरू, अमित शर्मा, सौरभ गट्टाणी, अंकुश सोमानी, अभिषेक चरखा, रोहित झांझरी, संदीप छाबडा, विशाल चांडक, दीपकभैया अग्रवाल, पुनीत शर्मा, गणेश खंडालकर यांच्यासह माधवराव अंभोरे, सायकलस्वार ग्रुपचे श्रीकांत इंगोले, दिगंबर जैन सोशल ग्रुपचे सचिन बज, परशुराम ब्राह्मण संघाचे मिलिंद गंडागुळे, वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव महेंद्र गंडागुळे उपस्थित होते. तसेच यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनीही या कार्यक्रमात आवर्जुन उपस्थिती दर्शविली.

 

Web Title: Tribute to the soldiers who were martyred at Sukama