शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

वाशिम जिल्ह्यातील आदिवासी गावे विकासापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 4:44 PM

वाशिम : शासनाचा बांधकाम विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभागाकडून विकासात्मक योजनांची अंमलबजावणी अगदीच धिम्यागतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावे विकासापासून आजही वंचित असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाचा बांधकाम विभाग, कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभागाकडून विकासात्मक योजनांची अंमलबजावणी अगदीच धिम्यागतीने सुरू असल्याने जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावे विकासापासून आजही वंचित असल्याचे दिसून येत आहे.‘ट्रायबल रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युट, महाराष्ट्र’कडून निवड करण्यात आलेल्या आदिवासी गावांच्या विकासाकरिता मंजूर केला जाणारा निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौचालये, मंगल कार्यालय, समाज मंदिर, पाणी पुरवठा, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, शालेय इमारत खोली बांधकाम, स्मशान भूमी शेड, पथदिवे, सौरऊर्जा आदी सार्वजनिक सुविधांवर खर्च करून या गावांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत; परंतु शेवटच्या घटकापर्यंत त्याची चोख अंमलबजावणी होणे अशक्य झाले असून आदिवासी गावांच्या विकासालाही ‘ब्रेक’ लागला आहे.प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पिंपळवाडी, खैरखेडा, भामटवाडी, गांगलवाडी, वाकळवाडी, कोलदरा, काळाकामठा, उमरवाडी, मुंगळा, मालेगाव किन्ही, धमरवाडी, पिंपळशेंडा, वाडी रामराव, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, धमधमी, कवरदरी, उदी, भिलदुर्ग भौरद आणि सवडद अशी २२ गावे आदिवासीबहुल आहेत. यासह मानोरा तालुक्यात गिराटा, विळेगाव, पिंपळशेंडा, ढोणी, खांबाळा, मेंद्रा, वटफळ, रुई, उज्वलनगर, पाळोदी, रंजीतनगर आणि रतनवाडी अशी १२ गावे आदिवासीबहुल आहेत. तथापि, काही गावांचा अपवाद वगळता आजही दुर्गम परिसरात असलेल्या बहुतांश आदिवासी गावांना मुख्य रस्त्यापर्यंत जोडण्यासाठी मजबूत तथा दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध झालेली नाही. याशिवाय इतरही विकासात्मक योजनांची अंमलबजावणी चोखपणे होत नसल्याने आदिवासी समाजातील नागरिकांना आजही गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमTrible Development Schemeआदिवासी विकास योजना