वृक्षारोपण व योग शिबिर संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:50+5:302021-06-04T04:31:50+5:30
नगराध्यक्षा डॉ. गझाला खान यांच्या उपस्थितीत महात्मा फुले उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. राम औताडे, ध्यास संपर्कप्रमुख ...

वृक्षारोपण व योग शिबिर संपन्न
नगराध्यक्षा डॉ. गझाला खान यांच्या उपस्थितीत महात्मा फुले उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. राम औताडे, ध्यास संपर्कप्रमुख अश्विनी औताडे यांचीही उपस्थिती होती. वृक्ष जगवण्यासाठी रोज पाणी घालून त्याची काळजी घेण्यात येईल, तसेच झाडे लावणे काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक किंवा दोन तरी झाडे लावून ते जगवावे, असे यावेळी अश्विनी औताडे यांनी सांगितले. तसेच कोरोना केंद्रात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी परिहार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, गट शिक्षण अधिकारी पवणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कोरोना केंद्रातील रुग्णांना योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिके करून सुदृढ आरोग्यसाठी दैनंदिन जीवनात प्रत्येकाने योगा करावा, असे आवाहन यावेळी औताडे यांनी केले.