दुघोरा येथे १० हेक्टर जमिनीवर वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST2021-07-15T04:28:24+5:302021-07-15T04:28:24+5:30
सामाजीक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र कारंजाच्यावतीने ग्राम दुघोरा येथील १० हेक्टर ई क्लास जमिनीवर नावीन्यपूर्ण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ...

दुघोरा येथे १० हेक्टर जमिनीवर वृक्षलागवड
सामाजीक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र कारंजाच्यावतीने ग्राम दुघोरा येथील १० हेक्टर ई क्लास जमिनीवर नावीन्यपूर्ण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या वृक्षलागवडीस सरपंच ज्योतीताई दीपक बांडे यांचेहस्ते प्रथम वृक्षलागवड करून करण्यात आली.या कार्यक्रमाला संतोष मानके, गणेश पुंड, मंगेश गुल्हाने, दीपकभाऊ बांडेसह सामाजिक वनीकरण विभागाच्या के. डी. वानखडे, एस. आर. डेकाटे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
१० हेक्टर ई क्लास जमिनीवर नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून जवळपास ११,११० खड्ड्यांमध्ये विविध प्रजातीच्या वृक्षांच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होऊन प्रत्येकांनी एक रोपटे लावून त्याचे संगोपन करण्याचा मोलाचा संदेश प्रसंगी मान्यवरांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना देण्यात आला.