वाशिममधील वाहतूक तासनतास ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 17:57 IST2018-11-05T17:55:19+5:302018-11-05T17:57:26+5:30
जडवाहतूकीचा प्रश्न गंभीर झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक तासन्तास ठप्प राहत असून नागरिकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.

वाशिममधील वाहतूक तासनतास ठप्प!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : हिंदु संस्कृतीमधील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाºया दिवाळीला सुरूवात झाली असून बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड उडत आहे. अशास्थितीत जडवाहतूकीचा प्रश्न गंभीर झाल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक तासन्तास ठप्प राहत असून नागरिकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शहरात एकमेव पाटणी चौक येथे मुख्य बाजारपेठ आहे. त्याचठिकाणी चारही बाजूंनी धावणारी वाहने आणि बिनबोभाट सुरू असलेल्या जडवाहतूकीमुळे पाटणी चौकात आल्यानंतर सर्वच वाहनांना ‘ब्रेक’ लागत आहे. त्यातून वाट काढताना पादचाºयांनाही जीव मुठीत घेवूनच राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता वाहतूक विभाग, पोलिस प्रशासन आणि नगर परिषदेने किमान दिवाळी सणाच्या कालावधीत तरी संयुक्तरित्या प्रयत्न करून वाहतूक सुरळित ठेवावी, अशी मागणी जोर धरत आहे.