देगावच्या निवासी शाळेचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर; २२९ विद्यार्थी आढळले होते पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 06:37 PM2021-02-25T18:37:00+5:302021-02-25T18:39:00+5:30

Covid Care Center वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली.

Transformation of Degaon School into Covid Care Center! | देगावच्या निवासी शाळेचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर; २२९ विद्यार्थी आढळले होते पॉझिटिव्ह

देगावच्या निवासी शाळेचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर; २२९ विद्यार्थी आढळले होते पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधित आढळून आलेल्या २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली.

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील भावना पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील कोरोनाबाधित आढळून आलेल्या २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, या शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी २५ फेब्रुवारी रोजी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला.
देगाव येथील संबंधित शाळेत आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी दाखल झाले. कोरोना चाचणी केल्यानंतरच शाळा सुरु करण्याचे नियोजन केल्याने, शाळा सुरु होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२९ विद्यार्थी तसेच ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत या विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २४ फेब्रुवारीला शाळेला भेट देऊन आढावा घेतला तसेच या सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली.

शाळेमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत बाधित विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होत आहे. २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील छातीचे चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा आरोग्य तपासणी केली. संबंधित शाळा कोविड केअर सेंटर म्हणून घोषित केली असून शाळा व वसतीगृहाचे निजंर्तुकीकरण करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे सातत्याने बाधित विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Transformation of Degaon School into Covid Care Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.