Training women to increase crop production | पीक उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण

पीक उत्पादन वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण

वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, पीक उत्पादन वाढीसाठी शेतकºयांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाने कृषी सखी व उमेद अभियानात सहभागी महिलांना कृषीविषयक प्रशिक्षण देण्याच्या गावनिहाय कृती आराखडा तयार केला. त्यानुसार २४ मे पासून प्रशिक्षणास प्रारंभ झाला असून, धानोरा, ुसुपखेला, गोंडेगाव, आसोला जहॉगीर येथे २४ ते २६ मे रोजी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. खरीप हंगाम सन २०२० अंतर्गत वाशिम तालुक्यात गावनिहाय प्रशिक्षण आराखडा तयार केला असून, जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासन कृषि विभाग यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत सर्व तालुका स्तरावरील अधिकारी, क्लस्टर प्रमुख व ग्राम स्तरावरील कृषी सखी, पशु सखी,बँक सखी, स्वयं सहायता समूहाच्या सर्व महिला सदस्यांच्या माध्यमातून गावातील सर्व शेतकºयांना खरिपातील घेण्यात येणाºया पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन पोहचविण्यात यावे यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावर, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांचे सूचनेनुसार कृती आराखडा तयार करण्यात आला असून २४ ते ३० मे या कालावधीत सर्व गावात ग्राम स्तरावरील उमेदच्या महिला प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर सर्व प्रशिक्षित महिला प्रशिक्षण घेऊन गावातील इतर सर्व शेतकºयांना मार्गदर्शन करतील असे नियोजन करण्यात आले.या अनुषंगाने तालुक्यातील धानोरा खुर्द व सुपखेला येथे २६ मे रोजी सर्व संबंधितांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. यात प्रामुख्याने खरिपातील पिकांचे विशेषत: सोयाबीचे एकरी उत्पादन वाढीसाठी व लागवडीचा खर्च कमी करण्याचे अनुषंगाने पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी मार्गदर्शन केले. नवनवीन संशोधित वाणांची निवड करणे, बियाणांची व खताची एकरी मात्रा, बीज प्रक्रियाचे महत्व, एकरी झाडांची संख्या, बीबीएफ यंत्राचे वापराचे फायदे व सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी गंधक वापराचे फायदे सांगितले. बीज प्रक्रिया व सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. धानोरा व सुपखेला येथे पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड हे मार्गदर्शक म्हणून हजर होते. यावेळी कृषी सहायक सुनीता वानखेडे, सुपखेला सरपंच विनोद पट्टेबाहदूर, प्रशिक्षणार्थी क्लस्टर प्रमुख, कृषी सखी, पशु सखी, बँक सखी व सर्व स्वयंसहायता समूह महिला सदस्य व प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शेतकºयांनी सोयाबीन हे सरळ वाण असल्याने घरचेच बियाणे स्वच्छ करून, चाळणी करून चांगले बियाणे निवडावे व त्याची उगवण क्षमता तपासणी करून खात्री करून घ्यावी व बीजप्रक्रिया करून पेरणीसाठी वापरावे. जेणेकरून बियाणे खरेदीसाठी लागणारा जास्तीचा खर्च टाळता येईल असे आवाहन कृषी अधिकारी भद्रोड यांनी केले.

Web Title: Training women to increase crop production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.