माती-पाणी परीक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST2021-01-13T05:44:56+5:302021-01-13T05:44:56+5:30
आत्मा अंतर्गत ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण उपक्रमांर्गत ११ ते १७ दरम्यान, माती-पाणी परीक्षण व एकात्मिक अन्नद्रव्य ...

माती-पाणी परीक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर प्रशिक्षण
आत्मा अंतर्गत ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण उपक्रमांर्गत ११ ते १७ दरम्यान, माती-पाणी परीक्षण व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरील निवासी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र करडाद्वारा संचालित माती परीक्षण प्रयोगशाळेद्वारे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी वाशिम मिलिंद कांबळे, कृषी अधिकारी एस. डी. वानखडे, आत्माचे जिल्हा समन्वयक एस. टी. राऊत व माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रमुख एस. के. देशमुख यांची उपस्थिती होती. उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्याकरिता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून पीक उत्पादन शाश्वतरीत्या वाढविण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृषिमित्रांनी माती परीक्षण या महत्त्वाच्या विषयाचे कौशल्य प्रशिक्षण घेऊन गावागावांत कृषिदूत म्हणून कार्य करावे, असे आवाहन केले. डॉ. गीते यांनी शेतजमीन सजीव असल्याचे सांगत शेतीमध्ये काडी कचरा कुजवून, तसेच सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा वापर वाढवून सेंद्रिय कर्बाची उपलब्धता वाढवावी, असे आवाहन केले. प्रशिक्षणास सहाही तालुक्यांतील निवडलेले १५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी माती परीक्षण प्रयोगशाळेतील कर्मचारी सुबोध कापसे, दत्ता काळे, अर्चना कदम, दिनेश चौधरी, मधुकर भोपाळे, आकाश अंभोरे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदाताचे प्रशिक्षण अधिकारी अभिषेक देशमुख यांनी केले. आभार तंत्र अधिकारी माती परीक्षण प्रयोगशाळा गंगाधर काळे यांनी मानले.
===Photopath===
110121\11wsm_4_11012021_35.jpg
===Caption===
माती-पाणी परिक्षण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर प्रशिक्षण