वाहतूक ठप्प, वाहनांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:42 IST2021-07-30T04:42:44+5:302021-07-30T04:42:44+5:30
तणनाशक फवारणी कामास वेग वाशिम : दोन दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने सोमवारी उघडीप दिली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तणनाशक ...

वाहतूक ठप्प, वाहनांची रांग
तणनाशक फवारणी कामास वेग
वाशिम : दोन दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने सोमवारी उघडीप दिली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणीच्या कामास वेग दिला असून खताची मात्रा देण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
दुचाकी वाहन तपासणीला ‘ब्रेक’
वाशिम : कोरोना काळात वेगवान ठरलेल्या दुचाकी वाहन तपासणी माेहिमेस गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून ‘ब्रेक’ देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे. मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी सूज्ञ नागरिकांतून होत आहे.
गाजर गवत निर्मूलनाची मागणी
अनसिंग : पावसाळ्याचे दिवस सुरू असून गाव परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवले आहे. याकडे ग्रा.पं.ने लक्ष पुरवून गाजर गवत निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.