लोणीफाटा परिसरात वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:48+5:302021-04-05T04:36:48+5:30
पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ...

लोणीफाटा परिसरात वाहतूक विस्कळीत
पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४ हजार ‘पीपीई कीट’ शासनाने उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
शेलूबाजार परिसरात जंतुनाशक फवारणी
शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात सदोदित स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच, शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशकांची फवारणीही करण्यात आली.
रोजगारासाठी मागणी नोंदविण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना त्यांच्या गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या मजुरांना तसेच स्थानिक मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मजुरांनी मागणी नोंदविण्याचे आवाहन प्रशसानाने केले.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी शनिवार व रविवारी करण्यात आली.
विळेगावातील हातपंप बंद
विळेगाव घुले : परिसरातील काही गावांमधील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्याची मागणी पंचायत समितीकडे वारंवार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त
मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ५६ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांनी केली.
रोहयोच्या कामाची देयके अदा करण्याची मागणी
तळप बु. : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शासनाने कुशल कामांचा निधी दिलेला नाही.
उन्हाची तीव्रता वाढली; जलस्रोत कोरडे
पोहरादेवी : यावर्षी मार्च महिन्यापर्यंत गावात पाणीटंचाई जाणवली नाही; मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जलस्रोतांमध्ये घट होत असून भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.