दगडफेकप्रकरणी रिसोडात कडकडीत बंद; व्यापाऱ्यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 13:52 IST2018-01-02T13:49:43+5:302018-01-02T13:52:18+5:30
रिसोड: येथील शिवाजी चौक परिसरात १ जानेवारीला सायंकाळी ६.४५ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी दुकाने आणि घरांवर दगडफेक केल्याचे पडसाद २ जानेवारी शहरात उमटले.

दगडफेकप्रकरणी रिसोडात कडकडीत बंद; व्यापाऱ्यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या
रिसोड: येथील शिवाजी चौक परिसरात १ जानेवारीला सायंकाळी ६.४५ च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी दुकाने आणि घरांवर दगडफेक केल्याचे पडसाद २ जानेवारी शहरात उमटले. रिसोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून, दगडफेक प्रकरणातील अज्ञात इसमांचा शोध घेण्याच्या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी पोलीेस स्टेशनमध्ये ठिय्या दिला.
१ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास अचानक काही अज्ञात इसमांनी अंदाधुंद पद्धतीने दगडफेक केली. यामुळे धास्तावलेल्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. खबरदारीचा उपाय म्हणून वाशिम येथूनही अतिरिक्त पोलिस कुमक बोलाविण्यात आली होती. २ जानेवारीला व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास व्यापाऱ्यांनी रिसोड पोलीस स्टेशन गाठत दगडफेक करणाºया अज्ञात इसमांचा शोध घेण्याची मागणी केली. पोलीस स्टेशनच्या आवारात सर्व व्यापाऱ्यांनी ठिय्या देऊन याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी लावून धरली. आठ दिवसात या घटनेतील अज्ञात इसमांचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले. दरम्यान, शहरात कडकडीत बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.